बेळगाव : शहर देवस्थान मंडळाच्या नावगोबा यात्रेच्या जागेचा स्मार्ट सिटीच्या कामामुळे के.एस.आर.टी.सी.ने जागेचा विकास केला. शंभर वर्षांपासून त्या जागेचा विविध यात्रेसाठी वापर होतो. डिफेन्स लँड म्हणून आहे ती यात्रेसाठी देण्यात येते. याबाबत के.एस.आर.टी.सी. ने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शिवाजीनगर पेट्रोल पंपच्या समोरील जागा मंजूर करण्यात आली. एकूण 34 गुंठ्या मधील दोन गुंठे जागा ही “लक्ष्मी मैदान” या नावाने नोंद आहे. त्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूरचे कॅन्टोन्मेंट अधिकारी तांबे सर व बेळगावचे के.एस.आर.टी.सी. चे अधिकारी यांच्या समवेत शहर देवस्थान मंडळाशी चर्चा करून सदर जागेमध्ये यापुढे यात्रा भरविण्याचे निश्चित झाले.
आज सकाळी के.एस.आर.टी.सी. चे अधिकारी व शहर देवस्थान मंडळाचे अधिकारी व आमदार अनिल बेनके यांनी सदर जागा देवस्थान कमिटीला दाखवून जागा हस्तांतराबद्दल पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावर्षी 10 जानेवारी रोजी नावगोबाची यात्रा त्याच ठिकाणी भरविण्याचा निर्णय शहर देवस्थान मंडळांनी घेतला आहे याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी. याकामी आमदार अनिल बेनके यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे शहर देवस्थान मंडळांनी त्यांना धन्यवाद दिले आहे.
याप्रसंगी आमदार अनिल बेनके यांच्या समवेत शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सुनील जाधव, अभि आपटेकर, मल्हारी कोराडे, जयवंत काकतीकर आदी उपस्थित होते.