बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकटीसाठी आणि काळा दिन आणि 25 रोजी मोर्चा संबंधी विचार विनिमय करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होणार आहे. मंगळवारी 19 रोजी दुपारी 2 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका म.ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …