
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी (ता. २९) रोजी मराठा मंदिर येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ऍड. श्रुती सडेकर व शीतल बडमंजी यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हळदीकुंकू कार्यक्रमाबाबत विविध गावांमध्ये महिला व महिला मंडळांची भेट घेऊन जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी तालुका समितीतर्फे महिला व युवा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचप्रमाणे हळदीकुंकू कार्यक्रमालाही जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, यासाठी समितीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. सर्व गावातील महिला व महिला मंडळांनी याची दखल घ्यावी तसेच हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी करावा, असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta