Wednesday , April 22 2026
Breaking News

रिंगरोडसंदर्भात म. ए. समिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

Spread the love

 

कोल्हापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. सीमा भागातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी संपादित केला जात आहेत. याचबरोबर अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी सकाळी गडकरी यांची भेट घेऊन, बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध शासकीय योजनांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत. यामुळे बेळगाव सीमा भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या संदर्भात गडकरी यांना निवेदन देतानाच, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका म. ए. समितीचे सेक्रेटरी ऍड. एम. जी. पाटील, शिवाजी सुंठकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, एपीएमसी माजी सदस्य सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे नेते दत्ता उघाडे, तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप ओऊळकर, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, कृष्णा हुंद्रे, आर. आय. पाटील, पुंडलिक पावशे आदि उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *