येळ्ळूर : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी होते. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. मोर्चाचा उद्देश सीमाभागात मराठी माणसाची व मराठी संस्कृतीची होणारी गळपेची. महानगरपालिकेवरील लाल-पिवळा अनाधिकृत ध्वज त्वरीत हटवावा यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जाहीर पाठींबा देण्याचा ठराव बैठकीत ठरविण्यात आला. व गावामध्ये जागृती करण्यात आली. मोर्चात सामील होण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता “श्री शांताराम कुगजी याच्या आड्डा” येथे उपस्थित राहवे. आणि 1 नोव्हेंबर काळा दिनी येळ्ळूरमधील सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध नोदवावा व बेळगांव मधुन निघणाऱ्या मुक मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले. या बैठकीला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, समितीचे कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी शिवाजी कदम, उपाध्यक्ष राजु पावले, खजिदार प्रकाश पाटील, शेकापक्षाचे चिटणीस विलास घाडी, मार्गदर्शक उदय जाधव, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, सुवर्णा बिजगरकर, वाय.सी ईगळे, भुजंग पाटील, श्रीकांत येळ्ळूरकर, बाळू पाटील, ओमकार कुगजी इतर उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …