बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले. या आश्रमामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थिनी शिक्षणाकरिता परगावाहून या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता आले आहेत. या विद्यार्थिनींचा दिवाळी सण द्विगुणीत करण्याकरिता माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडून नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. या गणवेश करिता मोलाचे सहकार्य केलेले खडेबाजार बेळगाव येथील ब्रायडल कापड दुकान चे मालक लतीफ मुनाफ पिरजादे हे आहेत. या केंद्रातील चाळीस मुलींना गणवेश वाटप करण्यात आला. यावेळी माधुरी जाधव फाउंडेशनचा संस्थापिका माधुरी जाधव, स्मिता शिंदे, भावकेश अष्टेकर, प्रेमा गुरव, सुनिता सुभेदार हे उपस्थित होते. यावेळी केंद्रातील सहकारी सोमनाथ चौधरी व विद्यार्थिनीनी लतीफ पिरजादे आणि माधुरी जाधव फाउंडेशनचे आभार मानले
