बेळगाव : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीसाठी खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयात परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी होणार असून भक्तांनी ३.३०च्या आत हजर रहावे, बरोबर ३. ४५ वाजता आरती होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रथम पादुकाभिषेक होईल आणि त्यानंतर अम्माभगवान भजन संकीर्तन कार्यक्रम होईल. भजन कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित भक्तांना दासाजी मार्गदर्शन करतील. शेवटी ऐश्वर्य प्राप्तीसाठी परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा कार्यक्रम संपन्न होईल.
शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल असे अम्माभगवान सेवा समितीच्यावतीने कळवण्यात आले असून जास्तीतजास्त भक्तांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सेवकांशी संपर्क साधावा
दीपा आजरेकर 82777 09730
दीपा सांबरेकर 88678 20721
सविता देगीनाळ 7349670146
