Thursday , April 17 2025
Breaking News

घर फोडून २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

Spread the love

बेळगाव : बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. पहिला मुख्य दुसरा क्रॉस सदाशिवनगर विजय बेकरीनजिक मंगळवार (ता.१६) सकाळी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अनुजा बसवराज धबाडी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी अनुजा या सदाशिवनगर शेवटचा बस स्टॉप येथे राहतात. तर त्याची आई सदाशिनगर पहिला मुख्य दुसरा क्रॉस येथे राहते. मुलीचे घर जवळच असल्याने त्या वरचेवर अनुजा यांच्या घरी राहायला येतात. त्याचप्रमाणे बुधवार (ता. १०) घराला कुलूप घालून अनुजा यांची आई मुलीच्या घरी राहायला आली होती. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घरचा पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील चार तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन ग्रामचे हिरेजडित नथ, २४५० ग्रॅम वजनाची चांदी व तीस हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार उघडकीस येताच शेजाऱ्यानी फोनवरून अनुजा यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेऊन पाहणी केली असता आईच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथक तसेच ठसेतज्ञांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *