
बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था, खडे बाजार बेळगांवच्या संचालक मंडळाची विद्यमान अध्यक्ष नारायणराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली. नारायणराव काकडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत त्यांची गौरवाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.
समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, बहुगुणी नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रय कोकणे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष : अशोकराव रेळेकर, सेक्रेटरी : शशिकांत हावळ, उपसेक्रेटरी : हेमंत हावळ, खजिनदार : रोहण उरणकर, संचालक दिपक खटावकर, विलास खटावकर, भाऊ मुसळे, सुरेश पिसे , सुनिल कोरडे, निरंजन बोंगाळे आणि महिला संचालक श्रीमती लीलावती रेळेकर अशी सर्व पदाधिकाऱ्याची आणि संचालक मंडळांची पंचवार्षिक निवड करण्यात आली.
या सर्व पदाधिकाऱ्याना समाजातील समाज बांधवांच्यावतीने शुभेच्छा देऊन सत्कार करून देंण्यात आल्या.
यावेळी अमर कोपार्डे, यशवंत परदेशी, प्रवीण कणेरी, देवेंद्र हावळ, रवि पिसे, अजित कोळेकर, महेश खटावकर, सुहास खटावकर, उमेश पिसे, संतोष राजगोळकर आणि समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta