बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी महाराज उद्यान येथून होणार आहे.
त्यानंतर बोलमल गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डब्बल रोड मार्गे बॅ. नाथ पै चौक येथे सांगता.
सायंकाळी पाच वाजता झाडशहापूर गावातून प्रारंभ संपूर्ण झाडशहापूर गाव फिरून मच्छे गावात पदयात्रेचा प्रवेश त्यानंतर संपूर्ण मच्छे गावात पदयात्रा फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जातील.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta