बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. 28 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ शहापूर येथील बॅ. नाथ पै चौक येथून होणार आहे.
त्यानंतर लक्ष्मी नगर, मेघदूत कॉलनी, भारत नगरमधील सर्व क्रॉस फिरून रयत गल्लीतून ढोरवाडा येथे सांगता.
सायंकाळी पाच वाजता यरमाल गावातून प्रारंभ. त्यानंतर अवचारहट्टी, देवगणहट्टी, मास्केनहट्टी, ब्रम्हलिंगहट्टी फिरून धामणे गावात प्रवेश. संपूर्ण धामणे गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जातील.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta