बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 29 रोजी सकाळी 7 वाजता जुने बेळगाव येथून पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे.
संपूर्ण जुने बेळगावमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पदयात्रा वडगाव येथील विष्णू गल्लीत प्रवेश करेल. तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन वझे गल्लीतून राजवाडा कंपाउंड भागातील मतदारांना भेटून मंगाई नगर, कारभार गल्ली, पाटील गल्लीतून यरमाल रोड येथे सांगता.
सायंकाळी पाच वाजता वडगाव पाटील गल्ली क्रॉस येथील शिवाजी महाराज पुतळ्याकडून प्रारंभ संपूर्ण संभाजी नगर, रणझुंझार कॉलनी, केशव नगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, आनंद नगर, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, सोनार गल्ली व दत्त गल्लीतील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जातील व पदयात्रेची सांगता होइल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी नगरसेवक, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta