Sunday , September 20 2026
Breaking News

आजरा आगारात 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिनाचे आयोजन

Spread the love

 

नेसरी (संजय धनके) : आजरा आगारात बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिन व कामगार पालक दिन असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असून या कार्यक्रमात प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यात येणार आहे.

सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील, त्यावरील उपाययोजनाबाबत प्रवाशांना विभाग नियंत्रक मार्गदर्शन करतील व दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत तसेच संघटनात्मक समस्या ऐकून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आगारात सादर कराव्यात असे आवाहन आजरा आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

Spread the love  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *