बेळगाव : बेळगावच्या सीमाभागाचा संघर्ष हा प्रत्येकाच्या रक्तातून निर्माण झालेला आहे. हौतात्म्य पत्करलेल्यांचे श्रम अजिबात वाया जाऊ दिले जाणार नाहीत. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी प्रत्येक मराठी माणसाने घराघरातून बाहेर पडायला हवे आणि आपल्या भगव्या झेंड्याच्या खाली सर्व भाषिक समाजाच्या उन्नतीसाठी सर्व बहुभाषकांनी एकत्र येऊन समोरच्या बलाढ्य प्रतिस्पर्धीवर मात करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक लढे यशस्वी केले. आता हा देखील एक मोठा लढा आपल्या समोर उभा आहे तो जिंकायचा असेल तर सर्व बहुभाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपल्या दक्षिण मतदारसंघातील समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना बहुमताने विजय करून विधानसभेमध्ये पाठवावे, असे आवाहन माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी केले.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांची पदयात्रा आणि प्रभात फेरी प्रचार फेरी सोमवार दिनाक 1 मे 2023 रोजी सकाळी सात वाजता भवानी नगर, चन्नम्मा नगर परिसरात पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. गरूप्रसाद कालनी, भवानी नगर, वाटवे कालनी, कावेरी नगर, पार्वती नगर, जैतनमाल, चन्नमा नगर येथील सर्व क्रॉस फिरून सुभाषचंद्र नगर येथून हिंदु नगर येथे सांगता करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन दक्षिणचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते पूजन करून पदयात्रेला शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रमुख उपस्थित माजी महापौर आप्पासाहेब पुजारी आणि उपमहापौर मधुश्री पुजारी, दिनेश राऊळ, सचिन गोरले, पिराजी शिंदे, प्रथमेश तारीहाळकर, अमर पाटील, अरुण मालवणकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, अनिल गावडे शिवाजी बंडू माने, विनायक पाटील, आकाश वर्मा पाटील, उमेश पाटील, महानंदा मालवणकर, रेणुका गाडेकर, अक्षया मालवणकर, परशराम कुंडेकर, सचिन दिवटे, अशोक चलवादी, सोमनाथ तंगणाचे, बाळू शिंदोळकर, जोतिबा शिंदोळकर, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta