बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
किनारी जिल्हे, सर्व दक्षिणेकडील अंतर्गत जिल्हे आणि अनेक उत्तरेकडील अंतर्गत जिल्हे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतील.
बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पल, रायचूर, यादगिरी या उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल.
चिकमंगळूर, कोडागु, मंड्या, म्हैसूर, रामनगर आणि चामराजनगर या दक्षिणेकडील भागातही मुसळधार पाऊस पडेल. बंगळुरूमध्ये सकाळी आकाश निरभ्र असेल आणि संध्याकाळी पावसाची शक्यता असलेले ढगाळ हवामान असेल.
Belgaum Varta Belgaum Varta