Monday , June 1 2026
Breaking News

सप्तश्रृंग गडावरील दरीत मोटार कोसळून सहा जणांचा मृत्यू

Spread the love

 

नाशिक : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील घाटात संरक्षक कथडा तोडून मोटार सुमारे हजार फूट खाली दरीत कोसळली. रविवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटूंबीय सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी रविवारी मोटारीने गेले होते. मोटारीत सात जण होते. दर्शन घेतल्यानंतर परतत असतांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गडावरील घाटातील गणपती पॉइंट या ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षक भिंत तोडून सुमारे हजार फूट खोल कोसळली. एखाद्या चेंडूसारखी मोटार दरीत कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला. या अपघातात कीर्ती पटेल (५०), रसीला पटेल (५०), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०), पचन पटेल (६०) आणि मणिबेन पटेल (६०) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सायंकाळी उशीरायर्पंत वणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद घेणे सुरु होते.

सप्तश्रृंग गड (ता. कळवण) येथे आज सायंकाळी झालेल्या अपघातग्रस्तांना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *