Friday , November 6 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love

 

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव, उपाध्यक्षपदी उद्योजक रघुनाथ बांडगी, मानद कार्यवाहपदी लता पाटील व सहकार्यवाहपदी प्रसन्न हेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीचा ठराव कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अभय याळगी यांनी मांडला व त्यास दशरथ सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले.

ऍड. आय. जी. मुचंडी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदर निवड एकमताने करण्यात आली.

यावेळी संस्थेच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच नूतन अध्यक्ष महोदयांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले व त्यांचे आभार मानले. याप्रसंगी अनंत लाड, सुनिता मोहिते, प्रा. विनोद गायकवाड, शिवाजीराव हंगिरकर, विशाल राऊत, अर्जुन गावडे व व्यवस्थापक विठ्ठल कडगांवकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *