बेळगाव : कामगार नेते ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा १८ जूनला साजरा करण्यात येणार आहे. समारंभाला नामवंत लेखक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सोहळा समितीच्या मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते. मराठा मंदिरमध्ये सायंकाळी पाचला हा समारंभ होणार आहे. ज्येष्ठ नेते कॉ. कृष्णा मेणसे समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी किरण ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सिद्दनगौडा पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी हे प्रमुख पाहुणे असतील. समारंभ यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची रचना करण्यात आली. बैठकीला सदानंद सामंत, शेखर पाटील, संजय सातेरी, चंद्रकांत मजूकर, संदीप मुतकेकर, खुर्शिद शेख, सई पाटील, प्रभावती शहापूरकर, गायत्री गोणबरे, अर्जुन सागांवकर, महेश राऊत आदी उपस्थित होते. कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta