सीमा तपासणी नाका बंदोबस्त कडक
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार्या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येणार आहे, अशी माहिती चिक्कोडी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी दिली. कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार डॉक्टर मोहन बस्मे, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डीवायएसपी मनोजकुमार नाईक म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. या ठिकाणी येणार्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. कोरोना डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नाही याची दखल प्रवाशी वर्गाने घेणे गरजेचे आहे.
यावेळी निपाणी सर्कल अजित वंजोळे, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एस. एम. सूर्यवंशी, पोलीस राजू गोरखनावर, आरोग्य सेविका सुमन पुजारी, सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्या कल्पना कलकुरकी, वंदना कुंभार, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.