बेळगाव : बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त एक मार्च रोजी (२०२२) कुस्तीचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकित सर्वानुमते ठरले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत लक्ष्मण अष्टेकर होते.
यावेळी के. आर. भाष्कळ यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक वाय. पी. नाईक यांनी करून कुस्ती नियोजनबद्दल आढावा घेतला. गेल्या वर्षी गावच्या सहकार्याने कुस्ती आखाडा यशस्वी केला होता. पुढील बैठकीत विविध समित्या स्थापन केल्या जातील असे सांगितले.
युवा नेते सुनील जाधव यांनी कुस्तीला मोठी परंपरा आहे, अशा आखाड्यातून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडले जातील. ग्रामीण भागात युवकांनी पुढे येऊन व्यसनाधीन न बनता जिद्द चिकाटी ठेवून गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे सांगितले.
मनोहर बेळगावकर यांनी सांगितले की, युवकांना प्रोत्साहन देणं, कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा आखाडा भरविण्याचा निर्णय घेतला आहे सर्वांचे सहकार्याने कुस्ती आखाडा यशस्वी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी प्रा. आनंद आपटेकर, पोमाणा कुनुरकर, परशराम भाष्कळ, मनोहर प. मोरे, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीत नूतन कार्यकारिणी गावच्या सहकार्याने एकमुखाने निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री. वसंत लक्ष्मण अष्टेकर, सचिव वाय.पी. नाईक, खजिनदार पी. एस. भाष्कळ, कार्याध्यक्ष मनोहर बेळगावकर, उपाध्यक्ष प्रा. आनंद आपटेकर, सहसचिव मनोहर मोरे, उपखजिनदार रजकांत अष्टेकर, मार्गदर्शक के. आर. भाष्कळ, सल्लागार म्हणून नियुक्ती पै.परशराम ना.भाष्कळ, सुरेश कांबळे, पोमाणा कुनुरकर, सुनील जाधव सदस्य म्हणून इतर दहा जणांची निवड करण्यात आली.
यावेळी भावकू मोरे, कृष्णा जाधव, शंकर पाटील, शिवानंद हलकरणिकर, बळीराम भास्कर, बापू सुतार, परशराम बरडे, गावडू मोरे, महादेव अष्टेकर, मलापा कांबळे आदि कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन के. आर.भाष्कळ व सुरेश कांबळे यांनी आभार मानले.
……
🙏🏻 अधिक माहितीसाठी संपर्क
वसंत अष्टेकर,…9740340630,