बेळगाव : मल्लिकार्जुन नगर आणि समर्थ नगर येथील विविध महिला मंडळानी एकत्रित येत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमात फक्त हळदीकुंकू नाही तर उत्तरचे आमदार राजू सेठ तसेच अहोरात्र काम करणाऱ्या आणि एका महिलेचे प्राण वाचविलेल्या काशिनाथ इरगार या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
सदर कार्यक्रम हा ओल्ड पीबी रोड येथील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार राजू सेठ, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्यासह रहदारी वाहतूक पोलीस स्थानकाचे पोलीस काशिनाथ इरगार उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री रेणुका देवी महिला मंडळ, श्री महालक्ष्मी महिला मंडळ, श्री साई महिला मंडळ, श्री दुर्ग दुर्गेश्वर महिला मंडळ, श्री सामर्थ्य महिला मंडळ, श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळच्या सर्व महिला मंडळाच्या सदस्या, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta