बेळगाव : येळ्ळूर विभाग प्राथमिक शाळेच्या 2023-24 सालातील प्रतिभा कारंजी व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरव केला. पहिली ते सातवी मध्ये भक्तीगीत प्रथम शिवण्या मुचंडी तर दुर्वा पाटील. कन्नड कंठ पाठ आरुष बीजगरकर तर सेजल घाडी. कथाकथनमध्ये श्रावणी पाटील आणि भक्ती बिर्जे. लघु संगीतमध्ये आराध्य गुंजिकर आणि भक्ती बिर्जे आणि धार्मिक पठणमध्ये सान्वी बेडरे वेशभूषामध्ये विधिशा मजुकर. क्रीडा आणि योगा मध्ये दुर्वा पाटील, सेजल घाडी, राशी पाटील, सोहम कुगजी, सिद्धी कुगजी, लक्ष्मी नायकोजी, अनुष्का चौगुले आणि श्रीनाथ हलगेकर या विधार्थांनी यश प्राप्त केले.
सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, आय. बी. राऊत, स्नेहल मजुकर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta