Wednesday , December 4 2024
Breaking News

शिवाजीनगर परिसरात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याची जागृती बैठक आज शनिवार रोजी शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी 2006 पासून कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात समिती मार्फत महामेळावा भरविला जातो आणि बेळगाववर आपला अधिकार सांगणार्‍या शासनाचा या मार्फत निषेध नोंदवला जातो, मराठी माणसाने समितीच्या मागे ठाम उभे राहून ह्या महामेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन केले, श्री. शिवाजी मंडोळकर यांनी शिवाजीनगर परिसरातून महामेळाव्याला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सुरज कणबरकर, श्रीकांत कदम यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
बैठकीला किरण मोदगेकर, श्रीकांत शितोळे, विनायक वरपे, अनुप किल्लेकर, विनायक बावडेकर, राहुल, लोहार, अनिकेत जाधव, चारुदत्त केळकर, महेश तरलेकर, संतोष निकम, हरीश पाटील, हृतिक सूर्यवंशी, पांडू पाटील, करण धामनेकर, आकाश पत्तार, पिंटू पाटील, प्रवीण रेडेकर, राजू कदम, आकाश भेकणे, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *