
बेळगाव (वार्ता) : हनुमानवाडीतील रहिवासी यापूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीत होते. सध्या ती बेळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. सदर हनुमानवाडी ही सर्व्हे क्र. 350/1 3 एकर 38 गुंठे सर्व्हे क्र. 350/1 हे कृष्णाजी भीमराव पाटील व करिअप्पा आयक्यप्पा पुजारी (रा.बेळगाव) यांच्या मालकीचे होते. 1989 साली सदर व्यक्तीने पूर्वीच्या पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून आवश्यक परवानगी व ले-आऊट मिळवून भूखंड विक्रीपत्राद्वारे विविध व्यक्तींना विकले. तेव्हापासून रहिवाशांनी ग्रामपंचायतीची वैध परवानगी घेऊन घरे बांधली. त्यानुसार ग्रामपंचायतीने ठेवलेल्या नोंदीमध्ये नाव फेरफार करण्यात आले असून 2013 पर्यंत पिररनवाडी ग्रामपंचायतीला नियमितपणे कर भरत आहेत.
हनुमानवाडी शहर महानगरपालिकेत (प्रभाग क्र. 1 आणि आता प्रभाग क्र. 53) घेण्यात आली होती. 2013 पासून नियमितपणे मालमत्तेशी संबंधित कर शहराला भरत आहेत.
ही वस्तुस्थिती आहे. मालमत्ता उतारा मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या प्राधिकरणाशी संपर्क साधला, तेव्हा अधिकारी तत्कालीन पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून नोंद वही प्राप्त झाले नसल्याच्या कारणावरून मालमत्ता उतारे देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे याबाबत अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांनी जाब विचारला आहे. परंतु ग्रामपंचायत अधिकारी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देत नाहीत आणि केवळ सर्व नोंदी व नोंदवही त्यांच्याकडे दिल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे रहिवाशांना उतारा मिळणे कठीण जात आहे. या संदर्भात सिटी कॉर्पोरेशन किंवा पट्टण पंचायत यांच्याकडे कोणतीही खरी आणि योग्य माहिती नाही. त्यामुळे या प्राधिकरणाने कृपया या प्रकरणात लक्ष घालून तक्रारींचा विचार करावा. शिवाय ग्रामपंचायतींना सूचना करून महापालिकेला मालमत्ता उतारा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.
निवेदनावर नारायण जवळकर, अश्विन दड्डीकर, कृष्णा सुतार, तेजस्वी कांबळे, राजू गुरव यांच्यासह रहिवाशांची नावे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta