बेळगाव : भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करत आहे, दलित समाजाच्या प्रगतीची भाजपाला काळजी नाही, असे विधान कर्नाटक प्रदेश समिती काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एफ. एच. जक्कप्पनवर यांनी केले आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवे काँग्रेसने दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली आहे. या कार्यालयात भाजपने स्वत:चे कार्यालय थाटले आहे. भाजपने याचे उत्तर द्यावे, असा आग्रह जक्कप्पनवर यांनी केला. सिध्दरामय्यांचे सरकार असताना 31 कोटी रुपये अनुसूचित समाजासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्याकाळात अनुसूचित समाजाचा सुवर्णकाळ होता. दलित मुलांसाठी वस्तीशाळा, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. उद्योजकांसाठी 10 कोटी उपाये राखीव ठेवण्यात आले होते. बेरोजगार युवकांसाठी 5 लाखांची सबसिडी जाहीर करण्यात आली होती. यामुळे हजारो जणांना रोजगार उपलब्ध झाला होता, असे जक्कप्पनवर म्हणाले.
भाजपचे सरकार आल्यावर सिध्दरामय्यांनी केलेल्या योजनांना स्थगिती देण्यात आली. कायद्यानुसार देण्यात येणारे अनुदान देखील देण्यात येत नाही. प्रत्येक वर्षी सादर होणार्या अर्थसंकल्पात 24 टक्के आरक्षण अनुसूचित जाती आणि जमातीसाठी देण्यात यावे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसंदर्भात असलेला 7 डी कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी जक्कप्पनवर यांनी केली. या पत्रकार परिषदेला कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती अनुसूचित जाती समाजाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …