Saturday , July 27 2024
Breaking News

कावळेवाडी राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

कावळेवाडी… राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हभप शिवाजी जाधव होते
प्रमुख अतिथी म्हणून मोहन मोरे, रिता बेळगावकर, उदयकुमार देशपांडे, डॉ. मिलिंद हलगेकर, गोपाळराव देशपांडे, प्रा. रुपेश पाटील, जावेद शेख, निलेश पारकर, सुरेश अष्टगी, बळीराम पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते
विशेष सत्कार ‌सुधीर चव्हाण, बी. बी. देसाई, बाळेश नाईक गडहिंग्लज, पैलवान मारूती घाडी यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
पंच म्हणून बाळासाहेब पसारे, एन. बी. कोळेकर, भारत गावडे अरुण दरेकर यांनी काम पाहिले.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल्स, गौरव पत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी युवराज पाटील, प्रकाश देसाई, मनोहर बेळगावकर, नागेश बेडका, परशराम गोवेकर, मोहन नाईक, एम. ए. नाईक, डॉ. परशराम हुंदरे, दत्तात्रय कुरविनकोप, ऍड. नामदेव मोरे, जोतिबा मोरे, केदारी कणबरकर, मोनापा मोरे, सूरज कणबरकर, तेजस्विनी कांबळे, कांचन सावंत, किरण यळुरकर, नागेश जाधव, गोपाळ जाधव,पवन कणबरकर हजर होते.
प्रास्ताविक वाय. पी. नाईक, सूत्रसंचालन मनोहर मोरे, आभार पी. आर. गावडे यांनी मानले.

 

कावळेवाडी मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल
चौदा वर्षे खालील मुलगे
प्रथम क्रमांक प्रेम बुरुड (कावळेवाडी), दुसरा -सत्यम पाटील (तारेवाडी -गडहिंगलज), तिसरा वैष्णव जाधव (तारेवाडी), चौथा क्रमांक सोहम कर्लेकर (नावगे), पाचवा वेदांत होसूरकर (तोपिनकट्टी).

चौदा वर्षे मुली पहिला ‍श्रेया कोलेकर (गर्लंगुंजी), दुसरा -भावना पाटील (बहाद्दरवाडी), तिसरा कृतिका गोवेकर (कर्ले), चौथा श्रुष्टि नागेनहटीकर (इदलहोंड), पाचवा सोनम पाटील (बडस).

पुरुष ओपन-प्रथम क्रमांक भैरव नाईक (आलदार, गडहिंग्लज), दुसरा भूषण गुरव (सन्नहओसूर), तिसरा सूरज भालेकर (हलकर्णी), चौथा कृष्णा कांबळे (नेसरी), पाचवा क्रमांक ‌नागेंद्र पाटील (चंदगड).

खुला गट महिला -पहिला सानिका हंजीकर (यडोगा), दुसरा सानिका पाटील (हजगोळी), तिसरा पूजा हलगेकर ((तोपिनकट्टी), चौथा सौंदर्या हलगेकर (तोपिनकट्टी), पाचवा समीक्षा वेताळ (कल्लेहोळ).

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *