Saturday , March 2 2024
Breaking News

वृद्धाश्रमात साजरा केला मीनाताई बेनके यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस!

Spread the love

 

बेळगाव : मोठ्यांचे आशीर्वाद जीवनामध्ये महत्त्वाचे असतात त्यामुळे एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी आपल्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरा केला आणि येथील वृद्धांना जेवणाचे वाटप केले.

अलिष्का अनिल बेनके हीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मीनाताई बेनके वृद्धाश्रमात दरवर्षी अन्नदान करतात. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी येथील वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना अन्न वितरित केले. यावेळी सर्वांनी अलिष्काचा वाढदिवसाचा केक कापला आणि तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी वृद्धाश्रमातील सर्व आजी -आजोबा उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 3 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *