बेळगाव : 38 बँका सभासद असलेल्या येथील बेळगाव जिल्हा अर्बन/सौहार्द सहकारी बँक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक 29 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. जाने. 2024 ते डिसेंबर 2028 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. बँकेच्या सर्व संचालकांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बी. बी. कगगनगी यांनी करून सभेची सुरुवात केली. त्यानंतर पुढील प्रमाणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली
मानद अध्यक्ष: एम. डी. चुनुमरी (गोकाक अर्बन बँक), अध्यक्ष: बी. बी. कगगनगी (बसवेश्वर बँक), उपाध्यक्ष: बाळासाहेब काकतकर (मराठा बँक), सचिव: पी एस ओऊळकर (तुकाराम बँक), खजिनदार: ए. के. महाजनशेट्टी (पाश्चापूर बँक) तसेच संचालक म्हणून अनंत लाड (पायोनियर बँक), उदयकुमार पाटील (सदलगा बँक), राजेश अणवेकर( दैवज्ञ बँक), शिवानंद लोकन्नवर (कौजलगी बँक), आर. टी. शिराळकर (बेल्लद बागेवाडी बँक), आर. बी. पाटील (जनता बँक हारूगिरी), वाय. एस. मिरजी (शांतापन्ना मिरजी बँक), एस. व्ही. कळीगुड्डी (यरगट्टी अर्बन बँक), अमृत शेलार (खानापूर अर्बन बँक) आणि सौ. राजेश्वरी एम कवटगीमठ (राणी चन्नम्मा महिला बँक) यांची तर विशेष निमंत्रित म्हणून मूडलगी अर्बन बँकेच्या एस. जी. ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रकारे एम.एस. शेट्टी (दैवज्ञ बँक), बी. ए. भोजकर (शांतपणा मिरजी बँक), एस.एस. पाटील (गोकाक अर्बन बँक), एस.एस. वाली (बसवेश्वर बँक), राजा बोळमल, सी.ए. यांची सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड कायम करण्यात आली. सभेला 16 सहकारी बँकांचे संचालक उपस्थित होते व सभेची सांगता श्री.बाळासाहेब काकतकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.