बेळगाव (वार्ता) : हिरेबागेवाडीजवळील विरप्पनकोप क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. अपघातातील तीघेही मृत यल्लापूर (जि. कारवार) येथील रहिवासी होते.
याबाबतची माहिती अशी की, धारवाड येथून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार विरप्पनकोप क्रॉस जवळ आली असता रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकवर जोराने आदळली. ही टक्कर एवढ्या जोराची होती की कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला. कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर दोघाजणांना गंभीर जखमी अवस्थेत सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात बळी गेलेल्यांची नावे वसिम खान (वय 40), सय्यद इस्माइल (वय 65) आणि सुशिला फर्नांडिस (वय 60) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांची नावे जावेद (वय 41) आणि मुख्तीयार (वय 45) अशी आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …