Sunday , December 14 2025
Breaking News

भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!

Spread the love

 

बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूकडील संपर्क रस्त्यावरून बेळगावच्या दिशेने जात होता. त्यावेळी कुत्र्याच्या भीतीमुळे काही बकरी राष्ट्रीय महामार्गावर धावत आली. यावेळी राष्ट्रीय महामार्गून बेळगावच्या दिशेकडे जाणाऱ्या ट्रकच्या ठोकरीत ही सर्व मेंढरे जागीच ठार झाली आहेत.
ट्रकची धडक हि इतकी जबरदस्त होती की हि १७ बकरी जागीच ठार झाली. या ट्रकच्या ठोकरीत अनेक बकऱ्यांच्या पोटातील आतडी, रक्त बाहेर पडले होते. हा अपघात इतका भीषण होता की ही सर्व बकरी एकाच वेळी जागीच ठार झाली आहेत. सदर दुर्दैवी घडल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
लागलीच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुशांताप्पा दासोळ व पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प हे घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. मेंढपालक रामा पुजारी याचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना हटवून, वाहतूक सुरळीत केली. मेंढपालक रामा पुजारी यांच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळविणारा होता, या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसल्यामुळे त्या घटनास्थळी आक्रोश करत होत्या.

About Belgaum Varta

Check Also

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

Spread the love  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *