Sunday , July 26 2026
Breaking News

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता

Spread the love

 

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकात कॅपिटल वन ही संस्था अर्थकारणाशी निगडित असून आपल्या दैनंदिन कामकाजा बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहे असे नमूद करून संस्था गेली पंधरा वर्षे सातत्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन यशस्वीपणे करीत आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असे नमूद केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संस्थेने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचा विद्यार्थी वर्गाने लाभ करून घ्यावा आणि परीक्षेला निर्भीड पणे सामोरे जावे असे आवाहनही त्यांनी केले.
श्री मय्याप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी व आपली मानसिकता कशी तयार करावी यावर काही उपाय विषद करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षीच्या शिबिरातील विषयवार यशवंत विद्यार्थ्यांचा व यंदा शिबिरासाठी आपला सहभाग दर्शविलेले तज्ञ शिक्षक
सर्वश्री सी.वाय. पाटील, बी.एम. पाटील, एम.व्ही. भोसले, सुनिल लाड, जोतिबा एस. पाटील, पी.आर. पाटील, एस.व्ही. भातकांडे, एस.एस. कोष्टी, के.के.चांदवाले, रणजित एन.चौगुले, सी.आय. पाटील व सौ. सविता पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव अतिवाडकर, रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, संस्थेचे कर्मचारी, पिग्मी संकलक उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सूत्रसंचालन एस. व्ही. भातकांडे यांनी केले. व्हा.चेअरमन शाम सुतार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *