मराठी द्वेषाने केलेल्या दुटप्पी कारवाईमुळे बेळगावात संतप्त प्रतिक्रिया
बेळगाव (वार्ता) : बेंगलोर घटनेनंतर बेळगावात आक्रोश व्यक्त करण्यात आला. त्यात बेळगावात काही ठिकाणी अज्ञातांकडून तोडफोड झाली. मात्र, त्यात शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी भाषिक असल्याने आणि मराठी द्वेष करत ही दुट्टपी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावात मराठी भाषिकांमध्ये या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बंगळूरमध्ये झालेल्या शिवमूर्तीच्या विटंबनेनंतर 17 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे चौकात बेळगावमधील शिवभक्तांकडून आक्रोश व्यक्त करण्यत आला होता. या दरम्यान काही प्रमाणात दगडफेक झाली त्या अनुषंगाने बेळगावमधील एकूण सत्तावीस मराठी कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली होती. यावेळीच किर्लोस्कर रोडवरील शिवनेरी फोटो स्टुडिओ, बापट गल्ली येथील शांती ग्रँड हॉटेलच्या काचा तसेच स्टेशनरोड जवळ नवरत्न हॉटेलसमोर थांबलेल्या सरकारी वाहनांच्या काचा अज्ञात लोकांकडून फोडल्या. गुन्हा नोंदवतानाही अज्ञात असा नोंदवण्यात आला होता. मात्र, आता अज्ञात लोकांसोबत शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील आणि प्रकाश शिरोळकर यांना सुद्धा जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध आणखी 3 गुन्हे खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी समाजकंटकानी मराठी फलकांची तोडफोड केली होती. तेव्हा जुजबी कारवाई करणारे पोलीस आज मराठी भाषिकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात पुढे दिसत आहेत. या दुटप्पी कारवाईमुळे शहरातील मराठी भाषिकामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …