बेळगाव : खडक गल्ली येथे सर्व महिलांनी एकत्रित येत सखी सह्याद्री या मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा उद्घाटन समारंभ आणि हळदी कुंकू कार्यक्रम खडक गल्ली येथील वेताळ मंदिर मध्ये पार पडला.
याप्रसंगी मंडळाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यांनी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी केले. तसेच यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक वैशाली हुलजी, नगरसेवक अफरोज मुल्ला, त्यांच्या पोलीस निरीक्षक ए. रुक्मिणी, सामाजिक सेविका प्रज्ञा शिंदे गल्लीतील ज्येष्ठ नागरिक उषा रजपूत मंडळाच्या अध्यक्ष सरोज आळवणी उपस्थित होत्या.
यावेळी सर्व महिलांनी एकत्रित येऊन मंडळ स्थापन केले असल्याने प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या आणि मंडळ येणाऱ्या काळात उत्तरारोतर प्रगती करत राहो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मीनाताई बेनके यांनी महिला मंडळाला कशाप्रकारे भांडवल एकत्रित करून वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजे. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे याची माहिती दिली. त्यानंतर वैशाली हुलजी यांनी हळदीकुंकूचे महत्त्व सांगितले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता नाईक यांनी केले.