बेळगाव : मौजे तीर्थकुंडे कौलापूरवाडा ता खानापूर येथील श्री रामलिंग मंदिर शेजारील कुस्ती आखाड्यात श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी तिथकुंडे कौलापूरवाडा महाशिवरात्री उत्सवानिमित्त रविवार ता. 10 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी शांतीकुमार वि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि अमित कुमार दिल्ली, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण वि कर्नाटक केसरी नागराज बसीदोनी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी वि राकेश कुमार दिल्ली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ कंग्राळी वि गुत्ताप्पा दावणगिरी या व्यक्तीरिक्त या मैदानात महेश तीर्थकुंडे, राज पवार, महातेश पाटील, रुपेश करले, ओमकार राशिवडे, प्रथमेश कंग्राळी, निशांत पाटील, सुरज कडोली, शंकर तीर्थकुंडे, रोहित माचीगढ, भीमसी काटे, अजित कंग्राळी, कुबेर पिरनवाडी, विनायक येळ्ळूर, केशव सांबरा, सिद्धार्थ तिथकुंडे, तेजम लोहार, रोहन कडोली, शिवम मुतगा, ओम कंग्राळी, हरीश तिर्थकुंडे, श्रीकांत शिंंदोळी, ओमकार सावगांव, महातेश संतीबस्ताड, रोहीत कोलीक, हर्ष कंग्राळी या मल्लांच्या कुस्त्यासह मेंढ्याच्या कुस्त्याही होणार आहेत. या मैदानात 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विविध तालुक्यातील कुस्ती-शौकींनानी या मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात
श्रीरामलिंगेश्वर मंदिर शेजारी आखाड्याची तयारी अंतिम टप्प्यात असून कुस्ती आखाडा बनविण्यात आला असून पाहुण्यांना बसण्यासाठी शामियाना व्यवस्था करण्यात येत आहे. नैसर्गिकरित्या असलेल्या या आखाडा चोहोबाजूने उंच मेर्रयावर असल्यामुळे नागरिकांना कुस्ती पाहण्यासाठी कोणताही त्रास होत नाही. खानापूर तालुक्यात एक मानाचे मैदान म्हणून पाहिले जाते यासाठी तिरकुंडे कुस्ती कमिटी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मैदान यशस्वी पार पडण्यासाठी कार्यरत आहे.