Friday , May 3 2024
Breaking News

“त्या” बँकेच्या महिला उपाध्यक्षांचा मानसिक छळ!

Spread the love

 

“त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे खूप खोलवर असल्याचे दिवसागणिक समोर येत आहे. नोकर भरती घोटाळा हा जरी वरवरचा असला तरी बँकेच्या अनेक व्यवहारात भ्रष्टाचाराचा आलेख अगदी चढा आहे. त्यामुळे एकंदरीत सदर सहकारी बँक अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असताना स्वतःच्याच संस्थेच्या एका महिला उपाध्यक्षांचा मानसिक छळ “त्या” अध्यक्षाने आपल्या काही साथीदारांना घेवून चालविलेला आहे.
नोकर भरतीची जाहिरात सदर बँकेने सुमारे २०२२ च्या एप्रिल – मे दरम्यान वृत्तपत्रातून दिली होती. भरतीचा निर्णय संचालक मंडळाचा झाला असला तरी सदर भरती प्रक्रिया पारदर्शक नसल्याने अनेक संचालकांनी त्याला विरोध केला होता. पण तरी देखील संचालकांचा विरोध डावलून नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती आणि त्याच वर्षी नोव्हेंबर दरम्यान सदर नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करत संचालकांच्या विरोधात जाऊन नोकर भरती करण्यात आली. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक माजी नगरसेवक, विद्यमान संचालक आणि अध्यक्षांनी मिळून अनेकांना बँकेत भरती करून घेतले. हा संपूर्ण प्रकार ज्यावेळी संस्थेच्या महिला उपाध्यक्षांना कळला त्यावेळी त्यांनी त्याला कडाडून विरोध केला. बाकी काही संचालकांचा विरोध भ्रष्टाचारी अध्यक्षाने त्या संचालकांना पैसे खाऊ घालून मोडून काढला. पण त्या महिला उपाध्यक्षांनी विरोध कायम ठेवल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू केला. एवढंच नव्हे तर त्यांना हिन दर्जाची वागणूक देत अपमानित करण्याचे प्रकार सदर संस्थेच्या अध्यक्षाने सुरू केले. शेवटी त्या महिला उपाध्यक्षांनी संबंधित खात्याकडे तक्रार दाखल केली. पण भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांना असे विरोध मोडून काढण्यात चांगलीच महारथ असतो आणि म्हणून त्यांनी सदर महिला उपाध्यक्षानाच त्या नोकर भरती घोटाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही. या अध्यक्ष व त्यांच्या सोबत असलेला एक माजी नगरसेवक आणि विद्यमान संचलकांचे प्रताप अजून मोठे आहेत असे बोलले जात आहे. बँकेला सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून हप्ते वसुली केली जाते. दिल्या जाणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या पगारातून देखील कमिशन खाल्ले जाते व सदर कंत्राटदार कंपनीला लाच घेवून टेंडर दिले जाते. सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील असाच प्रकार असल्याचे इतर संचालकांमध्ये चर्चा केली जात आहे. बँकेच्या नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे सुद्धा बोलले जात असून गेली कित्येक वर्षे नूतनीकरणाचे कंत्राट एकाच इंजिनियरला दिले जात असल्याने संशयाला जागा असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित लोकांना ज्यावेळी इतर संचालक जाब विचारण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी अध्यक्ष महाशय तारीख नसलेला राजीनामा देण्याची धमकी देतात आणि आपण किती स्वच्छ असल्याचे भासाविण्याचा प्रयत्न करतात.
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील कमिशन घेतल्याचा आरोप….

(क्रमशः)

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो…

Spread the love  करताय ना महाराष्ट्र दिन साजरा? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *