बेळगाव : बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या गोशाळेला पशुखाद्याचे वितरण करण्यात आले.
अतिउष्णतेमुळे जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली असून कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. अशावेळी मूक जनावरांच्या पाण्याचा आणि अन्नाचा तुटवडा भासत असून या पार्श्वभूमीवर बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या गोशाळेला पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. ६० हुन अधिक गायी असलेल्या या मठात १३ पिशव्या पशुखाद्य वितरित करण्यात आले. पुढील ८ दिवस पुरेल इतका पशुखाद्याचा साठा पुरविण्यात आला आहे. बेळगाव शहर तसेच परिसरात फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्यावतीने कुणाला मदत हवी असल्यास ९९८६८०९८२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta