बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना आणि ओमीक्रॉनचे संकट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल मंगळवारी नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. आगामी दोन आठवडे रात्रीच्या कर्फ्यु बरोबरच शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्याचबरोबर पुढील दोन आठवडे सामाजिक, राजकीय मेळावे, समारंभावर निर्बंध लादले आहेत. मोर्चे, यात्रा आंदोलनांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिर आणि प्रार्थना स्थळांमधील गर्दीला आळा घालण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांमुळे यावर्षीची 17 डिसेंबर रोजी होणारी, सौंदत्ती श्री रेणुका देवीची चुडी पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी चालविली होती. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आज गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका देवी देवस्थानासह सौंदत्ती जोगनभावी सत्यवती मंदिर, रामदुर्ग येथील विरभद्रेश्वर मंदिर, चिंचली येथील मायाक्का मंदिर, पंत बाळेकुंद्री येथील श्री दत्त देवस्थान दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आले आहेत.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …