Saturday , July 27 2024
Breaking News

उचगाव श्री मळेकरणी देवस्थान परिसरात यात्रा करण्यावर बंदी

Spread the love

 

उचगाव : उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये यापुढे पशुबळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले असून उचगाव आणि परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्याला बळी देऊन मांसाहारी जेवणावळी, यात्रा करता येणार नाही. जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवार दिनांक 27 मे रोजी उचगाव ग्रामपंचायत, देसाई भाऊबंद कमिटी, देवस्कि पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत बहुमताने हा ठराव संमत करण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे या होत्या.
उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सोमवारी सकाळी उचगाव गावातील सर्व ग्रामस्थ, देसाई भाऊबंद कमिटी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. उचगाव येथील प्रसिद्ध आणि जागृत असलेल्या मळेकरणी देवस्थानमध्ये वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार बकऱ्याचा बळी देऊन जेवणावळीचे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असत. या यात्रेमध्ये भक्ती कमी आणि मौजमस्ती मांसाहारी आणि दारू मटन यावरतीच जोर देत असल्याने उचगाव ग्रामस्थांचे जिने कठीण झाले होते. या यात्रेमुळे देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशूबळीमुळे या बकऱ्यांचे अवशेष रक्त आणि इतर टाकाऊ पदार्थ यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. याबरोबरच वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी परिणामी ग्रामस्थांना तसेच उचगाव कोवाड या मार्गावरती येजा करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास मंगळवार शुक्रवार सहन करावा लागत असे. दारू पिणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालल्याने मळेकरणी देवीच्या परिसरात जी शेतकऱ्यांची शेती आहे या शेतवडीत बियर आणि इतर बॉटल्स पिऊन दारू ढोसून त्या बाटल्या जाताना फोडून जाणाऱ्या या तळीरामांच्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणी ही मुश्किल झाले होते. तसेच याबरोबर होणारा केरकचरा हे सर्व काढणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले होते. या घाणीमुळे कुत्र्यांची संख्या अफाट वाढली असून अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरण्याची वेळ आली होती. याबरोबरच याच भागात मराठी, कन्नड प्राथमिक शाळा असून या मुलांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात अनेक येणाऱ्या रुग्णांना या दुर्गंधीशी सामना करण्याची वेळ आली होती. या आमराईतून कोणेवाडी, तुरमुरी येथून येजा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शेतवडीत येजा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या महिला यांना सुद्धा ह्या दारू ढोसून त्यांच्याकडून त्यांची छेडा छेडा आणि कुचबंना होत असे. या सर्वाचा सारासार विचार करून सदर यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
देवीच्या आमराईमध्ये मंदिरात येण्यासाठी कोणालाही बंदी नाही ज्या रितीरिवाज प्रमाणे ओटी भरणे, गारांना घालेने या ज्या प्रथा आहेत त्या नेहमीप्रमाणे चालू राहतील. देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही. जर यात्रा करायची असेल तर त्यांनी देवीचा कुंकू फुल घेऊन बकऱ्याला लावून त्यांनी आपल्या घरी ती यात्रा करावी आणि पै पाहुण्यांना त्यांनी जेवणावळी आपल्याच परिसरात कराव्यात मात्र उचगाव अमराई, देवीचा परिसर यामध्ये ही यात्रा करण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत.

“मंगल कार्यालयातून यात्रेवर बंदी”

याचबरोबर मंगळवार, शुक्रवार उचगाव परिसरातील जी मंगल कार्यालये आहेत याही ठिकाणी कोणालाही यात्रा करता येणार नाही. जर या ठिकाणी यात्रा कोणी केलीच तर त्यांचे वरतीही फौजदारी गुन्हा लागू करण्यात येईल. असा ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव मंजूर करण्यात आला आहे. तरी जी कार्यालय आहेत त्या कार्यालयातून कोणीही यात्रा करू नये असे बजावण्यात आले आहे. या बैठकीत ग्रामपंचायतचे पीडीओ शिवाजी मडवाळ यांनी यापूर्वी देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती यावेळी दिली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पुंडलिकराव कदम पाटील, युवराज कदम, बी. एस. होनगेकर , बाळासाहेब देसाई, डॉ. प्रवीण देसाई, संभाजी कदम, रामा कदम, यांनी प्रामुख्याने या गोष्टीवर आपले विचार मांडले.

स्वागत एन. ओ. चौगुले यांनी केले आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *