नवी दिल्ली : भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले नूतन मंत्री प्रल्हाद जोशी, निर्मला सीतारामन, एच. डी. कुमारस्वामी, शोभा करंदलाजे आणि व्ही. सोमन्ना यांची सोमवारी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना अनिल बेनके यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन केले. अनुभव आणि क्षमतेच्या आधारे मोदीजींच्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या आणि यावेळी मोदीजींच्या मंत्रिमंडळातील सर्वात अनुभवी आणि सक्रिय असलेल्या मंत्रिमंडळ सदस्यांचे अभिनंदन. तसेच देशाच्या उभारणीसाठी कटिबद्ध असणाऱ्यांची निवड होईल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदीजींच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे असे ते म्हणाले.
यावेळी बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते.