बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौधसमोर आज शुक्रवारी आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सदर उपक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात खासदार मंगला अंगडी यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करताना शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त ठरते. हा एक पुरातन भारतीय व्यायाम असून तंदुरुस्त आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज सूर्यनमस्कार घालावा. या व्यायामामुळे मनोबल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे स्पष्ट केले. सूर्यनमस्कार उपक्रम उद्घाटनानंतर खासदार अंगडी यांच्या हस्ते जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी जनजागृती करणारे पथनाट्य व कला प्रदर्शनाचेही उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, जिल्हा आयुष्य अधिकारी श्रीकांत सुनदोळी, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या या सूर्य नमस्कार उपक्रमा प्रशासकीय, पोलीस आदी विविध खात्यांच्या अधिकारी व कर्मचार्यांसह व्यायामप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने सहभाग दर्शविला होता.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …