बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा शाळेने विजेतेपद पटकाविले तर देवेंद्र जीनगौडा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम लढतीत संत मीरा शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 15-5 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या सोहेल बिजापुरे, श्रेयश खांडेकर, वेदांत यांनी प्रत्येकी 3 गोल तर श्रीनाथ सांबरेकर, मनीष शेट्टी, श्रेयश किल्लेकर यांनी प्रत्येकी 2 गोल केले, पराभूत संघातर्फे. चिन्मय मायगोटी, समर्थ जाधव यांनी प्रत्येकी 2 तर अमोघ बडगेर यांने 1 गोल केला.
तर प्राथमिक मुला-मुलींच्या व माध्यमिक मुलींच्या गटात देवेंद्र जीनगौडा संघ गैरहजर राहिल्याने संत मीरा शाळेला विजयी घोषित करण्यात आले. आता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे संघ पात्र ठरला आहे. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा शाळेच्या जेष्ठ शिक्षिका वंदना शिरोडकर, चंद्रकांत तुर्केवाडी, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर, विद्याभारती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिषेक गिरीगौडर, सिद्धांत वर्मा, समीक्षा बुद्रुक, मनस्वी चतुर, ऋतिका हलगेकर यांनी काम पाहिले.