येळ्ळूर : कलमेश्वर गल्ली येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे 1986 पासूनचे अध्यक्ष व जुन्या पिढीतील प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव सिद्धाप्पा काकतकर यांनी कलमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सढळ हस्ते पाच लाखाची मदत दिली. त्यांच्याच हस्ते मंदिर सुशोभीकरणाचे भूमिपूजनही करण्यात आले. प्रताप गल्ली येथील रहिवासी असलेले जुन्या पिढीतील एक नामवंत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव सिद्धाप्पा काकतकर हे येळ्ळूर गावच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कायमच अग्रेसर असतात. कलमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच लाखाची भरीव देणगी काकतकर यांनी दिल्याबद्दल कलमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. दातृत्व असावं तर महादेव काकतकर यांच्यासारख, त्यांचे मुलगे नारायण व दताबाळ काकतकर हे ही समाजकार्यात कायमच अग्रेसर असतात. त्यांची सून शांता काकतकर या येळ्ळूर गावच्या ग्रामपंचायत सदस्या असून त्यांनीही जनतेच्या सेवेला वाहून घेतले आहे. यांच्यासह गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी भरीव अशी आर्थिक मदत केली आहे त्याचबरोबर काही व्यक्तींनी वाळू, खडी, सिमेंट त्याचबरोबर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी लागणारे इतर साहित्यही देणगी दाखल दिले आहे. याही सर्व देणगीदारांचा कलमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य व गल्लीतील नागरिक उपस्थित होते.