बेळगाव : 2024 या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर एस आकाश चौगुले, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, गजानन सावंत उपस्थित होते. सुरूवातीला संगीत विभागातर्फे स्वागतगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन. सी. उडकेकर यांनी केले. यानंतर यावर्षी सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओंकार सुतार व स्वप्नील पाटील व त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभ्यासातील सातत्य, परीक्षा पास होण्याची जिद्द व खडतर परिश्रम या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असे मनोगतात त्यांनी सांगितले. श्री. आकाश चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व व्यवसायाच्या विविध क्षेत्रात असलेल्या संधींचा शोध घेऊन त्यानूसार शिक्षण पूर्ण करावे असा मौलिक सल्ला दिला. श्री. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अशा विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या गौरवात भर पडते असे गौरवोद्गार काढले
कार्यक्रमाला सर्व सत्कारमुर्तींचे पालक, सीए विनायक जाधव, सीए मल्लिकार्जुन सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सवीता पवार यांनी केले व आभार गजानन सावंत यांनी मानले.