बेळगाव शहर समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व शहर आणि भारती विद्यालय खासबाग बेळगाव यांच्यावतीने समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी. एस. लमाणे होते.
अभ्यासक्रमातील समाज विज्ञान हा महत्वाचा विषय असून कला शाखेतील शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्ययन – अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विद्यार्थी प्रगल्ब होतील, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भूगोल विषयातील संकल्पना व क्लिष्ट असलेल्या विषयांतील माहिती कशी सोप्या पध्दतीने अध्यापान करावे यावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून रवींद्र पाटील यांनी कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी भेट देवून कलाशाखेतील हा विषय केपीएस, युपीस यासारख्या परीक्षामध्ये महत्वाचे असून प्रशासकीय अधिकारी तयार होतात. तेंव्हा समाज विज्ञान विषयाला कमी लेखुन चालणार नाही असे विचार व्यक्त केले.
सदर कार्यशाळा भारती विद्यालय खासबाग बेळगाव येथे सभागृहात संपन्न झाली. तसेच फोरम अध्यक्ष एन. डी. पाटील , नोडल अधिकारी आय. व्ही. मोरे व प्रा. मुख्याध्यापक टी. एस. लमाणे व्यासपीठावर होते.
बेळगाव शहरातील माध्यमिक शिक्षक व शिक्षिका उपस्थित राहून भूगोल विषय चर्चात्मक सहभागाने कार्यशाळेतून शंकाचे निरसन करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता कुंभार यांनी केले तर आभारप्रदर्शन मोहन अष्टेकर यांनी मानले.