बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने येत्या ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक एक ऑगस्ट रोजी मॉरिशसच्या इस्कॉनचे श्री सुंदर चैतन्य गोसावी महाराज यांचे आगमन होत असून एक, दोन व तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत त्यांची प्रवचने होणार आहेत.
दिनांक 4 ऑगस्ट रोजी मुंबईच्या इस्कॉनचे श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे बेळगावात स्वागत होणार असून दिनांक चार, पाच व सहा या तीन दिवसाच्या वास्तव्यात ते भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. पाच ऑगस्ट रोजी मराठा मंदिर सांस्कृतिक भवनात होणाऱ्या सत्संग कार्यक्रमात भाग घेऊन ते भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 19 ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या वतीने श्री बलराम जयंती, 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, 27 ऑगस्ट रोजी नंदोत्सव व श्रील प्रभूपाद व्यासपूजा साजरी केली जात असून हा एक या चळवळीतील महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचबरोबर 11 सप्टेंबर रोजी श्री राधाष्टमी साजरी होणार असून त्या दृष्टीने इस्कॉन चे भक्त कार्यास लागले आहेत. या सर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इस्कॉनच्या शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर समोर भव्य मंडप उभारण्यात येणार असून बुधवारी त्या मंडपाची मुहूर्तमेढ इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त संकर्षण प्रभू यांच्या हस्ते उभारण्यात आली. याप्रसंगी बाळकृष्ण भट्टड, मदन गोविंद दास, राजाराम भांदुर्गे, नागेश रेणके, संजीव रेणके, अनंत लाड या प्रमुख भक्ताबरोबरच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta
हरे कृष्ण, हरे कृष्ण।
कृष्ण कृष्ण हरे हरे।
.