Wednesday , April 22 2026
Breaking News

दुचाकीचोरांकडून ७ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त : टिळकवाडी पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील विविध ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त याडा मारबानियांग, डीसीपी स्नेहा पी.व्ही., सहायक पोलीस आयुक्त एच. शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत वीरभद्रनगर, बेळगाव येथील रहिवासी हैदरअली शेख, अमननगर येथील रहिवासी नदीम शमसुद्दीन टोपीगार या आरोपींना अटक करत त्यांच्याकडून ७ लाख रुपये किमतीच्या एकूण १० दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, पीएसआय संतोष दलवाई, सीएचसी महेश पाटील, सोमलिंग करलिंगन्नावर, सीपीसी संजू संगोटी मल्लिकार्जुन पात्रोट, लाडजीसाब मुलतानी, तांत्रिक विभागाचे कर्मचारी रमेश अक्की यांचा सहभाग होता. या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी कौतुक करून बक्षीस घोषित केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *