Wednesday , May 29 2024
Breaking News

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचे सहर्ष स्वागत..

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे संकेश्वर मार्गे गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमाला जाताना संकेश्वरात दलित बांधवांनी त्यांची भेट घेऊन सहर्ष स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी, ॲड. विक्रम कर्निंग, पिंटू सुर्यवंशी, बाबू भूसगोळ, सोमेश जिवण्णावर, कांबळे सर, राजू कर्निंग, राहुल जैकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

संकेश्वर आमंत्रणाचा स्विकार

येत्या एप्रिल महिन्यात दलित समुदाय संमेलन आयोजित केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आमंत्रणाचा स्विकार राजरत्न आंबेडकर यांनी केले असून तुम्ही संमेलनाची तारीख ठरवा. मी नक्की येईन असे त्यांनी सांगितले आहे. याविषयी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीप होसमनी म्हणाले डॉ. बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे आधुनिक विचारसरणीचे आहेत. दलित बांधवांचा विकास संथगतीने होत आहे. देशाच्या विकासाच्या प्रवाहात दलित बांधवांना बरोबरीने घेऊन जाण्याचे कार्य राजकारणी लोक कोठेच करताना दिसत नाहीत. यासाठी दलित बांधवांनी संघटीत होऊन विकासाची कास धरायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर संकेश्वरातील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संमेलनाची तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

Spread the love  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *