बेळगाव : काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी तसेच लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी वडगाव विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते यांच्यावती बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
समिती आणि सीमालढ्यापासून दुर जाणाऱ्या युवकांना व नागरिकांना परत प्रवाहात आणण्यासाठी भविष्यात काय करावे यावर चर्चा करून पुढील वाटचाल ककरण्यासाठी सर्वानी बैठकीला वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.
Belgaum Varta Belgaum Varta