बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघातर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दुखःद निधनामुळे तातडीने व्यायामशाळेच्या सभागृहात मिटिंग घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कृष्णा फ. पावशे उपस्थित होते.
प्रथम सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर यांनी जागतिक किर्तीच्या गानसम्राज्ञी व भारतदेशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या महान कार्याची माहिती करून दिली. तसेच खजिनदार उदय नाईक, मार्गदर्शक रमाकांत पावशे, तुकाराम फडके यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली. तसेच कै. एन. डी. पाटील यांच्या
विषयी सुरेश नाईक यांनी भाषण केले. यानंतर यात्रोत्सव संघाच्यावतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल देसाई यांनी आभार मानले. यावेळी सदस्य प्रविण पाटील, चेतना अगसगेकर, अशोक कांबळे व संघाचे सदस्य उपस्थित होते.
