येळ्ळूर : आशादीप सोशियल वेल्फेअर सोसायटीतर्फे येळ्ळूर येथील वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली, यातील एक विद्यार्थिनी बीकॉमचे शिक्षण घेत दुपारी 12 नंतर रोजंदारीसाठी कामावरती जात जात शिक्षण घेत असते. त्याचबरोबर उदरनिर्वाहसाठी त्यांच्या आई सुद्धा रोजंदारीसाठी कामावरती जात असतात,
यावेळी आशादीपचे संस्थापक अध्यक्ष अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी उपस्थित होते.
समाजातील गरीब, गरजू व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहून त्यांना मदत करण्यासाठी कुगजी दाम्पत्य नेहमीच मनापासून प्रयत्न करीत असते. गरजवंतांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, म्हणून आपल्या परीने ते मदत करीत असतात. हे कार्य ते गेल्या कित्येक वर्षापासून अविरतपणे करीत आहेत. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील नेरसा, चाफेवाडा, हणबरवाडा, आसोगा या गावातील शेकडो विद्यार्थ्यांना गेली कित्येक वर्षे कुगजी दाम्पत्य शालेय साहित्याबरोबरच, गावातील लोकांना ब्लॅंकेट्स, टॉवेल, अन्नधान्य यासह रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे ते वाटप करीत असतात. त्यांच्या या कार्याचे कायमच नागरिकातून कौतुक होत असते.
Belgaum Varta Belgaum Varta